अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो ॥
पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो १
फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो २
कवी: नचिकेत जोशी
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो ॥
पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो १
फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो २
कवी: नचिकेत जोशी
७ टिप्पण्या:
सहीये रे!!
अप्रतिम! खूप खूप आवडली.
आत्मविश्व्वास जागविणारी तगडी कविता
amen :)
व्व्व्वा! आभाळच कवेत घेतलेत की. आवडले.
धन्यवाद सर्वांना! :)
सुपर्ब..! प्रचंड आवडली.
टिप्पणी पोस्ट करा