मधुमास !

हलकेच तू सख्या रे वदलास आज काही
कळले न ते इशारे, अदमास आज काही...

मनमोहना तुझी रे मुरली मला पुकारे
यमुनातिरी फुलावे मधुमास आज काही...

विसरायचे सख्याला 'विसरून' आज गेले
अजुनी मनात ओले सहवास आज काही...

खुणवायचे मलाही करपाश ते सुखांचे
घडणार काय येथे रे खास आज काही?...

उरली अजून थोडी जगण्यात आस वेडी
उरलेत श्वास थोडे हमखास आज काही...



काव्य आणि गायन: विशाल कुलकर्णी

६ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

खास! चांगली गायिली आहेस ही गझल.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

नक्कीच कांदा, चामड्याची चप्पल यापैकी काहीतरी जवळ घेवून बसली असणार ताई तू.;)
बादवे धन्यु !

Meenal Gadre. म्हणाले...

शब्दानां चाल जमली आहे. पण स्त्री आवाजात हवे होते. शब्दांना आवाज अनुरूप झाला असता.

ashish16 म्हणाले...

धन्य हो गझलकार विशाल, चाल डोक्यावरुन गेली पण गझल आवडली रे !

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मीनल, अगं इथे स्वत:च्या आवाजात गायचे होते तर बायकोने डोळे वटारले. स्त्री आवाजात कोण गाऊन देणार? हा, आता तू प्रयत्न करणार असशील तर स्वागत आहे ;)

Alvika म्हणाले...

mast. shevatache kadave jast avadale.