क्षण आणि आठवणी !

क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत
क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात

पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात
तरी कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात

जसे जुन्याच जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात

आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात

म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
की  त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणार्‍या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील


कवयित्री: जीवनिका कोष्टी

२ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

आवडली कविता.

ulhasbhide म्हणाले...

आठवणींची महती चांगली वर्णन केली आहे.