उद्या मी नसले तर...

द्या मी नसले तर
अगदीच काही हुंदका दाटणार नाही गळ्यात
अगदीच काही पाणी साठणार नाही डोळ्यात
पण चालता चालता काही पावलं मात्र थबकतील
चार दोन आठवणी डोळ्यांपुढे तरळतील
खोलवर कुठेतरी हालेल काहीतरी खास
क्षणभरच इथेच का ती असा मात्र होईल भास
पण पुढच्याच क्षणी काही उसासे सुटतील
आठवणीही त्यातून मोकळ्या होतील
भावनांची धारही मग बोथट होईल
आणि आठवेल, अशा वेळी काही बोलायचे असते
पण जाणार्‍याला वाईट बोलण्याचा प्रघात नाही आपल्याकडे
म्हणून जाता जाता ‘चांगली होती’ एवढेच फक्त म्हणून जातील

 (आपण नेहमी काहीतरी अपघाताच्या बातम्या वाचतो. कुणीतरी गेल्याच्या बातम्या पाहतो, वाचतो. अशा वेळी नेहमी माझ्या मनात येतं, आपण समजू शकतो की गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कसे वाटत असेल. त्याच्या जवळच्या व्यक्तींना कसे वाटत असेल. पण हे झालं जवळच्या माणसांचं वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परिघाबाहेरील व्यक्तींचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ते जे त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाहीत. त्यांना त्या घटनेबद्दल काहीही वाटणार नाही. ते त्रयस्थाच्या नजरेने त्याकडे पाहतील.

आता उरलेला भाग. असे लोक जे जाणार्‍या व्यक्तीला फार थोडे ओळखतात. जवळीक नाही पण तोंडओळख आहे. अशा लोकांची साधारण प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल मला उत्सुकता होती. ही कविता साधारणपणे याच लोकांची प्रतिक्रिया मांडते आहे. )

कवयित्री: जीवनिका कोष्टी

६ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

आशय वेगळा आहे.

Rravindra Ravi म्हणाले...

अप्रतिम, कल्पना छान आहे.

सुहास म्हणाले...

मस्त जमलीय.... आवडली !!

क्रांति म्हणाले...

'जन पळभर म्हणतील हाय हाय'

चांगली मांडली आहे जात्या जीवाची भावना.

क्रांति म्हणाले...

'जन पळभर म्हणतील हाय हाय'

चांगली मांडली आहे जात्या जीवाची भावना.

अनामित म्हणाले...

खूप आभार!!