मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी,
सांगतील एक, करतील भलतेच!
खाण्याचे दात, अन दाखवण्याचे,
अंतर किती?
जमी...न अस्मानाचे ! ॥ १||
आपणाला काय करायचे
म्हणा त्यांचे ते
छोट्यांचे मात्र आहे निराळे,!
बोलतील, तेच करतील.
जे ओठात, तेच पोटात,
दोन्हीतही असतो, मेळ एक ॥२॥
लोक मोठ्यांना घेऊन, नाचतील शिरावर,
छोट्यांना देतील, नाहक सुळावर
खरे आहे त्यांचे
हे असेच चालायचे,
हे असेच चालायचे. ॥३॥
पण हे यशोदात्या, गजानना !
ओरडावे वाटते तुझ्या काना
हातात असेल तुझ्या,
तर घेऊन ये आयुधांना
लबाडीचा कर चक्काचूर
सांभाळाया गोरगरीबांना
कवी: कै. वि. ना जांभेकर
प्रेषक :सुलभा मुंडले
सांगतील एक, करतील भलतेच!
खाण्याचे दात, अन दाखवण्याचे,
अंतर किती?
जमी...न अस्मानाचे ! ॥ १||
आपणाला काय करायचे
म्हणा त्यांचे ते
छोट्यांचे मात्र आहे निराळे,!
बोलतील, तेच करतील.
जे ओठात, तेच पोटात,
दोन्हीतही असतो, मेळ एक ॥२॥
लोक मोठ्यांना घेऊन, नाचतील शिरावर,
छोट्यांना देतील, नाहक सुळावर
खरे आहे त्यांचे
हे असेच चालायचे,
हे असेच चालायचे. ॥३॥
पण हे यशोदात्या, गजानना !
ओरडावे वाटते तुझ्या काना
हातात असेल तुझ्या,
तर घेऊन ये आयुधांना
लबाडीचा कर चक्काचूर
सांभाळाया गोरगरीबांना
कवी: कै. वि. ना जांभेकर
प्रेषक :सुलभा मुंडले
1 टिप्पणी:
सुलभा, कविता आवडली.
टिप्पणी पोस्ट करा