"प्रवास जीवनाचा...."

गण्याची लय गवसली,
असं जाणवताच
सर्वांग सरसावतं ठेका धरायला....

'पण-परंतू' येणारच आडवे.....!
खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली?

अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं,
बांधीलच जणू!
बिघडतोच ठेकाही!

प्रवास मात्र, तसाच
अखंडित..
त्याच्याच गतीचा...!!

येणार खळगे,
विस्कटणार सूरही..

तालास लयीची भेट
घडवून आणण्याची
कसरत आणि जिम्मा,
फक्त आपलाच!

जगणं असं स्विकारलं ना
की मग सहज जमतं,

लयीत ठेचकाळायला....


कवयित्री: बागेश्री देशमुख

८ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

सुंदरच!! लयीत ठेचकाळणं!! सुंदर शब्दप्रयोग. किती साध्या शब्दात बरंच काही सांगून गेली आहेस!!

Bob1806 म्हणाले...

sundarch ahe.

Bob1806 म्हणाले...

Ayushayvar chaan sopya shabdat kup kahi sangitles.

अमित गुहागरकर म्हणाले...

आवडली

क्रांति म्हणाले...

किती सहज किती मोठ्या गोष्टी सांगून जातेस बागेश्री! तुझ्या रचना नेहमीच उत्कट, भुलावणाऱ्या असतात. तशीच ही सुद्धा. खूप खूप आवडली.

ulhasbhide म्हणाले...

"जगणं असं स्वीकारलं ना
की मग सहज जमतं
लयीत ठेचकाळायला "
..... क्या बात है ..... मस्तच कविता.

Mr. Shantaram Khamkar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Mr. Shantaram Khamkar म्हणाले...

खूपच सुरेख नेहमीच्या सारखी
जीवनावर भाष्य करण्याची आणि
एकुणच जीवनावर प्रेम करण्याची
शैली, प्रकटीकरण...अप्रतिम!!!!