पावती

तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली

तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली

तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी

कवी: मंदार जोशी

८ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

छान आहे कविता - नितीन जोगळेकर

अमित गुहागरकर म्हणाले...

चोरटं प्रेम मस्त व्यक्त केलयसं..!! हीच तुझ्या कवितेची पोच'पावती' आहे.

क्रांति म्हणाले...

छान आहे कविता.

ulhasbhide म्हणाले...

अशा छोट्या छोट्या गोष्टी जपणं हेदेखील प्रेम असतं.

शांतीसुधा म्हणाले...

खरंय, पहिलं प्रेम हे न विसरता येण्यासारखं असतं आणि म्हणूनच अतिशय छोट्या गोष्टी आपन जपून ठेवतो. छानच!!

सुहास म्हणाले...

वाह वाह... !!

पाषाणभेद म्हणाले...

वा!
शेवटी प्रेम विसरला नाहीस तर!

अनामित म्हणाले...

jamalee naahee ajibaat