"सासर - माहेर! "

माधानाची ढेकर
माहेरच्या वाटेवर !
उचक्यांनी का बेजार
सासरच्या वाटेवर ?

माया आईची वाटते
लोण्यामधली साखर !
सासुबाईची ती माया
नुसती का खडीसाखर ?

आईची ती शिकवण
उघडा डोळ्यांची कवाडे -
जग सासूचे पाहून
मिळतील संस्कार-धडे !


कवी: विजयकुमार देशपांडे

२ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

ह्म्म्म.... सासर आणि माहेर.... दोन्हींचं वेगवेगळं महत्व.

क्रांति म्हणाले...

सासरच्या वाटे कुचुकुचु काटे ही मानसिकता बदलणारी कविता आवडली.
शेवटच्या ओळी खासच.