तांदळाचे दळे लाडू !

साहित्य: १)तांदूळ सुवासिक असल्यास उत्तम..एरवी कोणतेही चालतील - २पेले
             २) दळलेली साखर- २पेले
             ३)साजूक तूप- एक पेला
             ४)किसलेले/खवलेले(आवडीप्रमाणे) खोबरे- २पेले
             ५)वेलचीपूड,बेदाणे,काजू आवडीप्रमाणे

कृती: तांदूळ धुऊन,वाळवून मग कढईत सुकेच चांगले भाजावे..मात्र जास्त लाल होऊ देऊ नये. भाजल्यानंतर मिक्सरवर बारीक दळावे. तुपात साखर फेटून घ्यावी.नंतर त्यात खोबरेही मिसळावे. ह्या सगळ्या मिश्रणात हळूहळू मावेल तसे पीठ घालत जावे. त्यानंतर वेलचीपूड व काजू बेदाणेही घालून मिश्रण पुन्हा एकदा घोटून घेऊन मग त्याचे लाडू वळावे.


दुसरा प्रकार: आवडत असल्यास साखरेऐवजी गूळ वापरूनही हे लाडू करता येतात..बाकी कृती तीच आहे.
दिवाळीला थोडे नवीन असे हे लाडू सर्वांनाच आवडतील.

प्रेषक: श्रीमती जयबाला परूळेकर
           

1 टिप्पणी:

सुहास म्हणाले...

मस्त... दिवाळीला नेहमीच्या धाटणीचे पदार्थ खाऊन वैताग आलाय. असं नावीन्यपूर्ण खायला आवडेल :) :)