एकटा!

येणं जाणं इथं ..... रोजचंच होऊन बसलं आहे,
त्याच दु:खाची, तीच आसवं....,
नेहमी- नेहमी पिण्यापेक्षा ,

एकदाच त्यांना वाट मोकळी करुन दिली आहे ...,
काय केलं? कुणी केलं? भलंबुरं म्हणून........ ,
कधी विचारलंय का मी या जगाला ?
मग मीच का कुणाच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे ?
एका मागे एक... सगळीच निघाली म्हणून .....
मी ही जाणार नाही !!!!
स्वतःची वाट स्वतःच शोधायला ....
मी ""एकटा"" निघालो आहे !


कवी: राकेश दिनेश शेन्द्रे

७ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

राकेश, या आशावादी आणि अर्थपूर्ण कवितेनं मनात हार केलं आणि हे सुचलं

किसलिये सोचूं किसीकी, क्यों रखूं उनकी खबर?
ना सवालों का, जवाबों का कोई मुझपे असर
मैं हि मेरा कारवां और मैं हि मेरा राहबर
ढूंढ ही लूंगा अकेला, है कहीं मंजिल अगर!

ulhasbhide म्हणाले...

"स्वत:ची वाट स्वत:च शोधायला एकटा निघालो आहे"
छान ......
"एकला चलो रे" हे तत्त्व अवलंबावं लागतं अशावेळी.

शांतीसुधा म्हणाले...

"स्वत:ची वाट स्वत: शोधणे" एकदम मस्त. आयुष्यातील मोठं सत्य आहे हे. उल्हास भिडे, अगदी ’एकला चलो र” चीच आठवण झाली.

अनामित म्हणाले...

छान आहे!!

सुहास म्हणाले...

मस्त जमलीय :)

पाषाणभेद म्हणाले...

आशयपुर्ण कविता आहे.
शेवटच्या ओळीतला "एकटा" हा शब्द अवतरणचिन्हांशिवाय आला असता तर योग्य परिमाण लाभले असते असे वाटते. अर्थात कविला स्वःतचे स्वातंत्र्य आहेच.

राकेश दिनेश शेन्द्रे म्हणाले...

धन्यवाद , आभारी आहे तुमच्या प्रोत्सहना बद्दल ,
खरतर ..... ही अंशत: माझी कहाणी आहे असे म्हणायला हर्कर नाही ....
क्रांती ताई: " त्या जंगलातुन बाहेर जाण्यास "दोन" वाटा वळत होत्या एक- ज्यावर प्रत्येक व्यक्ती चालली होती, आणी दुसरा- ज्या वर कुणीही चाललेल नव्हत.

मी दुसरी वाट धरली आणी एक नविन विश्व पाहील>"

उल्हास काका:धन्यवाद , शेवटी माणुस हा एकटाच असतो , नाही का ?
पाषानभेद साहेब : ह्यात मला "एकटा" ह्या शब्दाला विशेस सांगायच होतं

तसेच शांतीसुधा, jivanika,सुहास,ह्याना विषेश आभार .......