कागदी फूलच ते ...

कागदी फूलच ते,
त्याला ना मधू, ना गंध
म्हणून ...
फुलपाखरू  इंद्रधनुषी रंग त्यावर कधीच नाही रचणार
रेशमी केसांवर ते कधीच नाही सजणार
देवाच्या पायी नतमस्तक होण्याचा मान त्याला कधीच नाही मिळणार
ते तसंच पडून राहणार...
त्याच्या डोळ्यांदेखत खर्‍या फुलांचे निर्माल्य होणार
आणि त्याच्या मनात एक शल्य कायम सलणार
पण,
कागदी का असेना, फूलच ते
कोमेजल नाही तरी चुरगळणारच कधी ना कधी
कारण या नश्वर जगात सौंदर्य कुठवर शाश्वत होऊन टिकणार?


कवयित्री: जीवनिका कोष्टी

७ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

कवितेचा आशय सुंदर आहे, पण "णार" याचा अतिरेक वाटतो.

Meenal Gadre. म्हणाले...

शाश्वत सत्य !!

ulhasbhide म्हणाले...

आशय जरा वेगळा आहे.

रविंद्र "रवी" म्हणाले...

छान, असाच लिहीत रहाव असं वाटत!!!

क्रांति म्हणाले...

उत्तम आशय.

अनामित म्हणाले...

आभार!!
मलाही तसच वाटल होत लिहिताना कि 'णार' जरा जास्त होतय.

अनामित म्हणाले...

आभार!!
मलाही तसच वाटल होत लिहिताना कि 'णार' जरा जास्त होतय.