चक दे इंडिया!



लेखन आणि अभिवाचन: अपर्णा लळिंगकर

६ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

ह्म्म्म्म...चांगला विषय निवडलास. अंतर्गत राजकारणामुळे आणि राजकीय अनास्थेमुळे ह्या खेळाची ही अवस्था झालीय... :(

विनायक पंडित म्हणाले...

आवडलं! क्रिकेटचं जरा अति अतिच झालंय एवढं खरंच!दुसरीकडे इतर खेळात खूप चांगले खेळाडू निर्माण होताएत!

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

अपर्णाताई,
लेखवाचन ऐकले. नाविन्यपुर्ण वाटले.
विषय तळमळीने मांडलास अणि हॉकीच्या अधोगतीची उजळणी झाली.
क्रिकेट आणि हॉकी खेळांची बरोबरी होऊ शकत नाही. काही ८ -१० देशाच्यात, त्यातील काही टाचणीच्या टोकावरून शोधायला लागतील इतके छोटे.
इंग्रजांनी आपल्या रंजनासाठी विरंगुणळ्याचे साधन म्हणून निर्माण झालेला क्रिकेट राजे- राजवाड्याच्या आश्रयाने भारतात पेरला गेला. आणि तो नंतर पारशी व अन्य जिमखान्यातून खेळला जाऊ लागला. असो.
तिकडे हॉकीत फुटबॉल नंतर अनेक युरोपियदेश खेळायला लागल्यापासून भारताची त्यावरील पक़ड सुटत गेली. खेळात स्टीक कौशल्य कमी होऊन बळाला मान आला आणि भारत व पाकिस्तानातील हॉकीला ग्रहण लागायला लागले. असो.
हे चालायचेच. पैसा हा खेळाचे महत्वाचे प्रस्थ बनल्याने खेळात अनेक अपप्रवृत्ती आल्या आणि संघभावनेला, देशाभिमानाला पैशाच्या विळख्यात गुदमरावे लागते आहे. वैश्विक अर्थकारणांचा प्रभावही आहे खरा. पण हे मळभ संपेल तर छान.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

धन्यवाद सुहास. हो ना, ह्यावेळी वर्ल्ड कप फाईनलच्या वेळी हैद्राबादला कॉन्फरन्स ला गेले होते तेव्हा तर पंचतारांकित हॉटेल मध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या इंजीनीअर्स आणि मॅनेजर्स साठी त्यांनी एक पूर्ण कॉन्फरन्स हॉल बुक केला होता केवळ सेमी-फायनल आणि फायनल बघण्यासाठी. तिथे अक्षरश: लोक गाद्यांवर लोळत होते थंड-गरम आणि चकणे घेऊन. प्रत्येक बॉल सरशी आवाजाची लाट यायची आणि सरायची. प्रश्न पडतो हेच का ते टाय लावून चकाचक ऑफिसेस मध्ये काम करणारे आणि एसी गाड्यांमधून फिरणारे. बाहेर रस्त्यावर आलं तर गल्ली-बोळ झोपडपट्टीतही तीच तर्‍हा.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

धन्यवाद विनायकजी. हा विषय ज्यावेळी लिहायचं ठरवलं त्यावेळीच मनाची तयारी केली होती की आपण एका स्फोटक विषयावर लिहीत आहोत. कदाचित क्रिकेट हा धर्म मानणार्‍यां कडून शाब्दीक हल्ले होतील. पण आपल्या देशात दुर्दैवाने अशी परीस्थिती लवकरच येईल की जेव्हा इतर खेळ फक्त म्युझियममध्ये माहिती दाखल असतील आणि सगळीकडे क्रिकेट!!

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

धन्यवाद शशिकांतजी! सध्याच्या तरूणांचं क्रिकेट्साठीचं वेड बघितलं की खरंच मला तरूणांची किव येते. क्रिकेट खेळून (मॅच फिक्सींग करून उगाच खेळण्याचं नाटक) पैसे प्रेक्षकांचे जातात आणि आर्थिक फायदा जाहिरात कंपन्या (मुख्यत: पेप्सी, कोक, किंगफिशर, बॅगपायपर सारख्या तस्तम पेयांच्या), बीसीसीआय, आयसीसीआय साख्या भ्रष्टाचाराच्या आगारांचा, ज्यांनी त्यात पैसे गुंतवलेत त्यांचा तसेच उपग्रह वाहिन्यांचा होत असतो. प्रेक्षक वर्ग आपला वेळ, पैसे खर्च करून उल्लु बनत असतो.