हे जीवन सुरमय होऊ दे !

तो चंद्र आज नभी नाही
ही रात्र पार पडू दे

प्रेमदोर हाती तिच्या
ती माय थोडी निजू दे

धनधान्ये येती उदरी तिच्या
ती धरा सुपीक होऊ दे

पक्षी विहंगी विहरती
ते नभ निरभ्र होऊ दे

रांगा लागती दारी तुझ्या
गजर त्रिलोकी अंबे उदे

सुप्त ज्ञान  विकसती तेथे
ते मंदिर उजळून जाऊ दे

प्रेम विश्वास आधार देई
ती मैत्री वृद्धी लागू दे

सुरात सूर मिसळून जाई
हे जीवन सुरमय होऊ दे !


कवयित्री: अलका काटदरे