सुरळीच्या वड्या !

साहित्य : १ वाटी बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ), १ वाटी आंबट ताक, १ वाटी पाणी,
             चवीनुसार  मीठ, पाव चमचा लाल तिखट,  थोडी हळद.फोडणीसाठी तेल व मोहरी.
सजावटीसाठी : खवलेला ओला नारळकोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची (आवडीनुसार)

कृती : बेसन,ताक व पाणी तिन्ही गोष्टी एकत्र करून गॅसवर ठेवाव्यात, त्यात मीठ, हळद व लाल तिखट घालून सतत ढवळत राहावे, गुठळी होऊ देऊ नये. मिश्रण शिजले की ते गरम असतानाच त्यातले थोडे थोडे मिश्रण घेऊन ताटाच्या दोन्ही बाजूला लावून थंड करावे व थोड्या वेळाने त्यांच्या गुंडाळ्या करून ठेवाव्यात. हे मिश्रण तुम्ही अल्यूमिनियम फॉईलवर पण पसरवू शकता. नंतर सगळ्या वड्या एका बाऊलमध्ये काढून घ्याव्यात आणि त्यावर फोडणी पसरावी आणि नंतर  नारळ व कोथिंबीर घालून वाढाव्यात.

प्रेषक: वैशाली काजरेकर

३ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

माझी सगळ्यात आवडती पाकृ. एकदम सही. [त्या वड्या छाचिमधून उचलून घेता आल्या असत्या जर जास्त मजा आली असती. गुगलकाकांना अशी काही सोय करायला सांगावं लागेल!] :)

शांतीसुधा म्हणाले...

मलाही आवडतात सुरळीच्या वड्या. एकदम सोप्या आहेत करायला. आता करून बघेन. धन्यवाद.

सुहास म्हणाले...

सहीच !!