टोरंट!

मी हल्लीच एक कथा लिहिली होती. त्यामध्ये डेक्स्टर या सीरियलचा रेफरन्स बरेचदा आला.  बर्‍याच लोकांनी हे सीरियल कुठे आणि कसे मिळेल ह्यासाठी  चौकशी केली. ही सगळी सीरियल्स कशी आणि कुठून डाउन लोड करायची याची माहिती देण्यासाठी हे पोस्ट लिहितोय.

इंटरनेटवर जवळपास सगळेच चित्रपट , अगदी १९३० पासून तर आत्तापर्यंतचे विनामूल्य अव्हेलेबल आहेत. तसेच बर्‍याच टीव्ही सीरियल्स ( अर्थात इंग्रजी) पण नेट वर डाउन लोड करण्यासाठी अव्हेलेबल आहेत. बरीच जुनी पुस्तकं, जी आऊट ऑफ प्रिंट ( इंग्रजी) आहेत ती पण तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता.

मराठी, इंग्रजी , आणि हिंदी गाणी- अगदी हवे असेल ते गाणे तुम्हाला इथून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. गाणी डाउनलोड करण्यासाठी इतरही बर्‍याच साईट्स आहेत, पण इथे टोरंटवर जो साठा आहे त्याला अजिबात तोड नाही.

टोरंट्सवर कित्येक जिबीची फाइल सुद्धा अगदी सहजपणे डाउनलोड केली जाऊ शकते. जर तुम्ही डाउनलोड करत असाल, आणि मध्येच तुम्हाला कॉम्प्युटर बंद करायची वेळ आली तरीही डाउनलोड कॅन्सल होत नाही. तुम्ही पुन्हा जेव्हा कॉम्प्युटर सुरू कराल तेव्हा तेच डाउनलोड पुन्हा सुरू केले जाऊ शकते. एकच सांगावसं वाटतंय, की जर तुम्ही पायरसीबद्दल फार सेन्सेटीव्ह असाल, तर हे पोस्ट पुढे वाचू नका.  :)
बरेच लोकं कॉपी राईट्स , पायरसीबद्दल खूप हल्ला करतात, त्यांच्यासाठी हे पोस्ट नाही. हे टोरंट म्हणजे नेमकं काय ? यावर खरं तर पूर्वी पण एक पोस्ट लिहिलं होतं. त्याची लिंक इथे आहे. आज फक्त टोरंट कसे डाउन लोड करायचे याची अगदी थोडक्यात माहिती देणार आहे.

टोरंट डाउनलोड करण्यासाठी एक लहानसा प्रोग्राम लागतो. त्याला म्यु टोरंट म्हणतात . आधी तो डाउनलोड करून आपल्या कॉम्प्युटर वर इन्स्टॉल करून घ्या.  म्युटोरंट साठी ही लिंक आहे. इतकं केलं की पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप तुम्ही पूर्ण केली. हा डाउनलोड केलेला क्लायंट तुम्हाला प्रत्येक डाउनलोडच्या वेळेस उपयोगी पडणार आहे.

या नंतरची स्टेप म्हणजे आपल्याला हवा असलेला सिनेमा किंवा सीरियल शोधणे. त्यासाठी मी स्वतः http://isohunt.com  ही साईट वापरतो. या साईटवर आपल्याला हव्या असलेल्या सिनेमाचे नांव सर्च मध्ये टाइप केले की  त्या सिनेमाची बरीच  टोरंट सापडतात. टोरंटची  क्वॉलिटी कशी आहे, हे पाहण्यासाठी  कॉमेंट्स  चेक करा.   कॉमेंट वाचून व्हिडिओ , ऑडिओ क्वॉलिटी कशी आहे हे समजते. बरेचदा, टोरंट वर नांव एका सिनेमाचे असते, पण खरा सिनेमा भलताच असतो. अशी फसगत होऊ नये म्हणून डाउनलोड करण्यापूर्वी  इतरांच्या कॉमेंट्स वाचणे कधीही योग्य ठरते.  तसेच प्रत्येक टोरंटच्या समोर   सिडस आणि पिअर्स असे हेडींग आणि त्याखाली काही आकडे दिसतील. त्यामधले  जास्तीत जास्त सिड्स असलेले टोरंट निवडल्यास, फाइल डाउनलोड लवकर होईल.

एकदा डाउनलोड पूर्णं झाली, की   डाउनलोड फोल्डर उघडून ती फाइल बघू शकता. हे सगळं इथे फक्त माहितीसाठी दिलेले आहे. तुम्ही याचा वापर कसा करायचा किंवा करायचा की नाही, ते आपल्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून करावा ही अपेक्षा.

लेखक: महेंद्र कुलकर्णी

७ टिप्पण्या:

सुहास म्हणाले...

टोरंट समस्त इंटरनेट विश्वाचा एक अविभाज्य घटक बनलाय... P2P तंत्रज्ञानाची क्रांती म्हणूया हवं तर :) :)

अनामित म्हणाले...

There are so many websites to download torrents. Most famous site is THe Pirates Bay abbreviated as TPB.
http://thepiratebay.org/browse

क्रांति म्हणाले...

चांगली माहिती. मी उतरवला आहे, पण अजून वापरला नाही. माझी लेक मात्र नियमितपणे हवं ते उतरवून घेत असते टोरंटच्या मदतीने.

Swap म्हणाले...

there are many clients other than utorrent ..

also i use demonoid site for downloads .. personally i found it most reliable so far

i will not recommend using piratebay .. it has many virus/spam torrents .. so when using be careful.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान माहितीपूर्ण लेख. आवडला. मी म्यू टॉरंटचा भरपूर वापर करतो. पण तांत्रिक माहिती अजिबात नव्हती. आता अज्ञान किंचित दूर खाले. धन्यवाद.

विनायक पंडित म्हणाले...

धन्यवाद हेरंब! छान माहितीपूर्ण लेख!

Mandar katre म्हणाले...

पायरसी आणि कॉपीराईट बद्दल खूप उलटसुलट चर्चा होत असते , पण गमतीची गोष्ट म्हणजे अशा शेअरिंग वेबसाईट किंवा टोरेंट ज्या देशात रजिस्टर होतात किंवा त्यांचे सर्व्हर ज्या देशात असतात ,ते असे देश असतात कि जिथे कॉपीराईट चा कायदा लागू होत नाही ,म्हणजेच त्या देशांनी त्या करारावर सही केलेली नाही,यास्तव तार्किकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या ती चोरी ठरत नाही, इतर माहिती बद्दल आभार! धन्यवाद.
मंदार कात्रे