डोळे !

किती बोलतात गं डोळे तुझे आई,
कधी आनंदाने माझे मन उजळवतात ,
तर कधी चुकी झाल्यावर रागाने दटावतात
पण नेहमीच असते त्यात उमेदीची नवलाई...

कधी निराशेच्या मळभात ते सूर्य बनून चकाकतात
तर कधी उगाच मिश्किल हसतात
कधी मला किती तरी प्रश्न विचारतात
तर कधी न विचारताच सारी उत्तरे देतात..
किती बोलतात गं डोळे तुझे आई...

कधी या डोळ्यांनीच शिकवते आम्हाला जगाला सामोरे जाण्याची धिटाई ,
तर कधी हेच डोळे आमच्या अश्रूंचाही भार साही..
किती बोलतात गं डोळे तुझे आई....

कधी आधाराचे आश्वासक कटाक्ष ,
कधी जाणीवेची नरमाई ...
करतात ते प्रत्येक सुखदु:खाला साक्ष
पण हीच सारी तुझी पुण्याई.
किती बोलतात गं डोळे तुझे आई.......


कवयित्री: अश्विनी अशोक कबाडे

२ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

"कधी हेच डोळे आमच्या अश्रूंचा भार साही"
.... हे आवडलं.

क्रांति म्हणाले...

आईबद्दलच्या भावना छान व्यक्त केल्यात अश्विनी. आवडली कविता.