गण !

रू या वंदन गणरायाला
                गण वगाचा सुरू कराया            ||धृ||

हाती धरूनी पंचारती
रिद्धीसिद्धी तुज ओवाळती
जाणोनिया तुझिया किर्ती
          आलो आम्ही तुझ्या पुजेला      ||१||

कार्यारंभी तुला वंदिती
भय नच आता नच दुश्किर्ती
रसिक समोरी मोदे बसती
   झडकरी या या शुभलाभाया ||२||

करू या वंदन गणरायाला
गण वगाचा सुरू कराया ||धृ||

कवी: पाषाणभेद (उर्फ सचिन बोरसे)

४ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

गणेशवंदन चांगलं जमलंय

क्रांति म्हणाले...

अगदी मस्त जमला आहे गण. लोकसाहित्यातले काव्यप्रकार हाताळण्यात हातखंडा आहेच तुमचा. आवडली ही रचना.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

पाभे, मस्त जमलंय :)

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

गणेश वंदनाचा गण गुणगुणायला मस्त आहे !