मागणे!

जून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो    ॥

पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो        १

फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो        २

 कवी: नचिकेत जोशी

७ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

सहीये रे!!

क्रांति म्हणाले...

अप्रतिम! खूप खूप आवडली.

ulhasbhide म्हणाले...

आत्मविश्व्वास जागविणारी तगडी कविता

Sahaj suchala mhanun म्हणाले...

amen :)

सुधीर कांदळकर म्हणाले...

व्व्व्वा! आभाळच कवेत घेतलेत की. आवडले.

नचिकेत जोशी म्हणाले...

धन्यवाद सर्वांना! :)

अमित गुहागरकर म्हणाले...

सुपर्ब..! प्रचंड आवडली.