मोजके आयुष्य !

 मोजके आयुष्य उरले संपलेला श्वास आहे
रोज जगतो मरण आम्ही, जीवनाचा ध्यास आहे

लोकशाही आज आहे, या युगाची राजभाषा
वाट चुकलेल्या पिढीचा 'न्याय' आता दास आहे

रोज घोटाळे किती होती, किती झाले हवाले?
स्वार्थ केवळ यार येथे माणसाचा खास आहे

कोडग्या त्या उंबर्‍याची कौतुके भरपूर झाली
ध्येयवेड्या या मनाला अंबराची आस आहे

आंधळी स्वप्ने 'विशाला' सोड आता पाहणे तू
मनगटाची साथ पक्की, सर्व बाकी भास आहे


काव्य आणि गायन: विशाल कुलकर्णी

५ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

वा! सुंदर गातोस विशाला! गझल तर चांगलीच आहे. तुझ्या अजून एका गुणाची ओळख झाली या अंकाच्या निमित्ताने.

विशाल म्हणाले...

कस्चं..कस्चं... ताई ! :D
मन:पूर्वक आभार !!

ashish16 म्हणाले...

विशाल, आवाज छान लागलाय

विशाल म्हणाले...

आभारी आहे आशिश :)

Alvika म्हणाले...

mast gaqzal.