मायबोली !

माझी लाडकी, माझी लाडकी, माझी लाडकी, मायबोली ,
जात-धर्म, भाषा-पंथ पुसण्याशी आली.        ॥१॥  

पुणे-कोंकण, अमेरिका-लंडन, वा असो गोवा,
       देश-परदेशातील लोकाचा आहे हा दुवा          ॥२॥

गप्पागोष्टी, कट्टा, गजाली, व पार वरण्या गप्पा!!
    मला आवडती, सर्वात जास्त, निसर्गाच्या गप्पा. ||३||

किती माहिती, किती ज्ञान, किती फोटो पहा,
        माहिती देण्या, तत्पर इथे, दिनेशदा आहा.      ||४||

जागू, साधना, शांकली, योगेश, आणिक किती,
    देती सर्व, येथे येऊन, किती माहिती.             ||५||

अंताक्षरी, स्पर्धा, कोडी, असे मनोरंजन,
           चिंता, शंकांचे, चर्चेने त्वरित होई निवारण. ॥६॥

किती नाती, किती मैत्री, किती ते भांडण,
        सुख-दुखा:ची , नित्य येथे, देवाण-घेवाण  ॥७॥

प्रकाशचित्र, कविता-गझल, कथा-कादंबरी,
      सर्वाना हक्काचे, व्यासपीठ जणू घरी       ||८||

आता एक विनंती, माझ्या देवा,
                   हा नित्य असो, असाच ठेवा                   ||९||

अशी लाडकी, ही सर्वांची असे  मायबोली,  
        माझी लाडकी, माझी लाडकी, माझी लाडकी, मायबोली ||१०||

कवयित्री: सुलभा मुंडले

७ टिप्पण्या:

अमित गुहागरकर म्हणाले...

आवडली. विषेशतः ती ६ वी द्वीपदी.

क्रांति म्हणाले...

छानच! मायबोलीची सगळी वैशिष्ट्ये आली आहेत कवितेत.

Meenal Gadre. म्हणाले...

माय मराठी आहेच अशी सर्वांग सुंदर!

ulhasbhide म्हणाले...

व्वा .... ’मायबोली’ ची महती चांगली वर्णन केलेय.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मस्त गो आज्जे ;)

Mukteshwar म्हणाले...

aavadli

सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! मस्त.