॥नापास हुप्प्या॥

ही कविता फिलीप अर्नेस्ट नावाच्या एका कॅनेडियन व्यक्तीने लिहिलेली आहे; संस्कृतचे अध्ययन आणि रामायण-महाभारत ह्या विषयावरचे संशोधन हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. फिलिप ह्या त्यांच्या मूळ नावाचा अर्थ आहे अश्वमित्र...म्हणून तेच नाव त्यांनी इथे धारण केलेले आहे.  मराठी भाषेचेही थोडे-फार ज्ञान त्यांना आहे. कवी अरूण कोलटकर ह्यांचे ’द्रोण’ हे दीर्घकाव्य वाचल्यावर त्यातूनच प्रेरणा घेऊन  त्यांनी ही कविता जन्माला  घातली आहे. त्यामुळे त्यांनी ती जशी लिहिलेय तशीच, इथे कोणताही फेरफार न करता आणि शुद्ध लेखन इत्यादि न तपासता देत आहे. तेव्हा त्याकडे त्याच दृष्टीने पाहावे ही विनंती
 
एका दिवसात, पाऊस पडतांना,
म्हैसूरला आगगाडीत
नापास हुप्प्या आला. 
उठून तो पटकन
म्हैसूर विद्यापीठात
फिरून फिरून गेला.
तिथे श्री श्री श्री
सर्वेपल्ली राधाकृष्णन
त्यांच्या ऑफिसला गेला. 
श्री श्री श्री
सर्वेपल्ली राधाकृष्णननी
नापास हुप्प्याला म्हटले. 
हुप्प्या बाबा, काय
करायचे तुम्हाला
विद्यापीठात.
नापास हुप्प्याने
उत्तर केले.
श्री श्री श्री राधाकृष्णन, 
मी केंब्रिज विद्यापीठाकडून
येतो. मी संस्कृत
पी एच डी आहे.
मला महाभारत व
रामायण खूप आवडतात.
कृपया मला सेवा द्या. 
श्री श्री श्री
सर्वेपल्ली राधाकृष्णननी
उत्तर म्हटले.
तुम्हाला संस्कृत बोलणे
येते. नापास हुप्प्याने
म्हटले, नाही.
बर, तुम्हाला कन्नड भाषा
बोलणे येते का. नापासने
नाही म्हटले.
तुम्हाला अध्यापन
करणे येते मग.
हुप्प्या म्हणतो, नाही. 
तुमची किती आर्टिकल
किंवा पुस्तके आहेत.
हुप्प्या म्हणतो, एक आर्टिकल. 
श्री श्री श्री
सर्वेपल्ली राधाकृष्णन
एक मिनीट शांत होते. 
मग बोलले. हुप्प्या बाबा,
तुम्ही मला खरच
एक चांगले प्राणी दिसता. 
तुम्हाला मदत द्यायची.
आम्हाला गार्ड
आणि क्लीनर पाहिजे.
ही तुमची सेवा असेल.
नापास हुप्प्या बाबा,
कृपया हे अप्लिफ्टमेंट घ्या. 
म्हैसूर विद्यापीठाहून
नापास हुप्प्या
फिरत फिरत गेला.
त्याच्या डोळ्यांहून
मोठे अश्रु
पडत पडत होते.
आजून फिरतांना
त्याला दोन कुत्री
रस्त्यात दिसली.
युद्ध करत होती.
त्यांच्या मुखात
काहीतरी दिसत होते.
नापास जवळ येतांना,
ती दोघी कुत्री
भयभीत धावली.
त्या हुप्प्याने
ती गोष्ट जमिनीहून
हातात घेतली.
एक मॅनूस्क्रिप्ट होते,
खूप खूप पुराण,
रामायणाचे.
अरे वा, म्हटले
नापास हुप्प्याने.
श्री पंडितांना दाखवायचे. 
म्हैसूर विद्यापीठाला
फार फार सुखी
नापास परत आला.
विद्यापीठामधे फिरतांना,
नापासला एक विचित्र
गोष्ट दिसली.
एका अतिथिनिवासमधे,
एका खोलीत,
एक श्वेतमुख बसला होता. 
तो डेस्कला बसून
लिहीत लिहीत होता.
जॉन स्मिथ होता,
प्रसिद्ध श्वेतमुख
संस्कृत पंडित,
केंब्रिज विद्यापीठाचा.
खिडकीमधून
नापासला जॉन
दिसत होता.
अरे वा, नापासने म्हटले,
माझे केंब्रिज गाईड
कशाला म्हैसूरला आले. 
अतिथि निवासाला
नापास हुप्प्या
धावत धावत गेला.
त्वरित वरती जाऊन,
झाडाच्या शाखेला
नापास पोचला.
तिथे जॉन स्मिथच्या
खिडकीसमोर,
त्या हुप्प्याने नर्तन केले. 
त्या झाडमधे नर्तन करतांना
मॅनूस्क्रिप्ट जॉन स्मिथ ला दाखवतांना,
नापास हुप्प्याला संपूर्णानंद झाला.
ही कविता त्यांच्याच आवाजात खाली ऐका.काव्य आणि काव्यवाचन: फिलिप अर्नेस्ट उर्फ अश्वमित्र

२ टिप्पण्या:

Wahida Kazi म्हणाले...

मस्तच ! त्यांचे ते " श्री श्री सर्वपल्ली राधाकृष्ण" हे उच्चार कानाला ऐकायला मजा वाटली :-)

श्रेया म्हणाले...

अश्वमित्र, तुमचे उच्चार फारच स्पष्ट वाटले.एखाद्या दीर्घकाव्यावरून प्रेरणा घेऊन एका अमराठी माणसाने मराठीत कविता करावी शिवाय तिचे काव्यवाचन करावे ही बाब नक्कीच स्पृहणीय आहे.