कॉलेजातली एक मुलगी
लग्नानंतर भेटली असेल
तेंव्हा जितकी सुंदर होती
त्याहून सुंदर वाटली असेल.
घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !
तुम्ही म्हणाल ...
तेंव्हा अशी नव्हती हसत
जरी इतकीच सुंदर
होती दिसत !
घाबरू नका
तेंव्हा तुम्ही शोधलंत तिला
आज तीच तुम्हाला शोधत असेल
तेंव्हा चटकन उठली होती,
आज नक्कीच सोबत बसेल.
अहो .... ! हे काही भविष्य नाही
हे हि तारूण्याचंच लक्षण आहे ....
ती हि अजून तरुण आहे
हेच यातलं शिक्षण आहे !
ती जवळ आल्यावर
तुम्ही आणखी जवळ याल
तिने बोट दिल्यावर
तुम्ही हात हातात घ्याल !
हात हातात आल्यावर
तुम्ही नक्की हरवून जाल
तिने "पुढे काय म्हटल्यावर"
पुन्हा तुम्ही भानावर याल ...
मग मला विचाराल ...
"आता हे कसलं लक्षण आहे ..?"
मी म्हणेन ....
यात माझं हि अधुरंच शिक्षण आहे !
पण घाबरू नका ...!
हे काही खरं नसतं ...
तुझे-माझे श्वास वगेरे ...
नुसते मनाचे भास वगेरे !
लोक म्हणतील "लागलं पिसं,
वयानुरूप होतं असं ...."
पण घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !
कवी: रमेश ठोंबरे
लग्नानंतर भेटली असेल
तेंव्हा जितकी सुंदर होती
त्याहून सुंदर वाटली असेल.
घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !
तुम्ही म्हणाल ...
तेंव्हा अशी नव्हती हसत
जरी इतकीच सुंदर
होती दिसत !
घाबरू नका
तेंव्हा तुम्ही शोधलंत तिला
आज तीच तुम्हाला शोधत असेल
तेंव्हा चटकन उठली होती,
आज नक्कीच सोबत बसेल.
अहो .... ! हे काही भविष्य नाही
हे हि तारूण्याचंच लक्षण आहे ....
ती हि अजून तरुण आहे
हेच यातलं शिक्षण आहे !
ती जवळ आल्यावर
तुम्ही आणखी जवळ याल
तिने बोट दिल्यावर
तुम्ही हात हातात घ्याल !
हात हातात आल्यावर
तुम्ही नक्की हरवून जाल
तिने "पुढे काय म्हटल्यावर"
पुन्हा तुम्ही भानावर याल ...
मग मला विचाराल ...
"आता हे कसलं लक्षण आहे ..?"
मी म्हणेन ....
यात माझं हि अधुरंच शिक्षण आहे !
पण घाबरू नका ...!
हे काही खरं नसतं ...
तुझे-माझे श्वास वगेरे ...
नुसते मनाचे भास वगेरे !
लोक म्हणतील "लागलं पिसं,
वयानुरूप होतं असं ...."
पण घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !
कवी: रमेश ठोंबरे
५ टिप्पण्या:
साध्याच गोष्टी, पण मजेदार ढंगात सांगितल्या आहेत
मस्त धमाल कविता रमेश.
http://www.youtube.com/watch?v=Rc85_rjYpUA
हे गाणं आठवलं.
कड्ड्ड्ड्ड्ड्क. आवडली. अर्थातच तेच माझ्या तारुण्याचे लक्षण आहे.
khup surekh ......
aani manapasun patanari hi
धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा