आशा !

कासावीस जीव, आवंढा घशात
अडकलेला श्वास, धडधड उरात
विलक्षण बेचैनी, काहूर काळजात
प्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात
उत्तरांची आशा, फक्त स्वप्नात
स्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात
कधी उदास, भकास अंधारात
चिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात
सुटकेची प्रतीक्षा, इतकंच का हातात?
नक्कीच नाही.... हार एवढ्यात
बरंच काही आहे अजूनही हातात
निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात
नव्याने रंग भरायचे जगण्यात
उभारी कसोशीने जागवायची मनात
कारंजं सुखाचं, हसेल दारात

कवयित्री: जयश्री अंबासकर

४ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

"निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात
नव्याने रंग भरायचे जगण्यात"
.... छान
आशावाद आवडला.

Alvika म्हणाले...

khup chhan. aavadali.

अमित गुहागरकर म्हणाले...

आशादायी कविता..!

mau म्हणाले...

खुप सुंदर कविता !!!
"निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात
नव्याने रंग भरायचे जगण्यात" मस्त वाटले वाचुन ..