जाहल्या काही चुका!

जाहल्या काही चुका अन् दूर काही वाजले
तू दिलेले ते पराठे सवडिने मी चावले

बायकोच्या घोरण्यातच रात्र सारी संपली
अन् पहाटे उच्च आवाजात हाकहि ऐकली
मी फटीतून चादरीच्या खेळ सारे पाहिले

घरहि माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या यातना
रंग भाळावर  निळे अन् जीवघेण्या वेदना
तू असे का लाटण्याने भाळ माझे भेदिले

संपता माझी कमाई, सांग तू चिडशील का?
घेतली ना पैठणी जर, सांग तू रुसशील का?
लाड सारे पुरविण्या मी, घाम माझे गाळले

विडंबनकार: अमित गुहागरकर
मंगेश पाडगांवकरांनी लिहीलेलं हे मुळ गीत http://www.aathavanitli-gani.com/GenPages/Song.asp?Id=27093162620 या लिंकवर उपलब्ध आहे.

२ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

लै लै भारी विडंबन. मजा आली वाचताना.

ulhasbhide म्हणाले...

मजेदार विडंबन