खारे (नमकीन) पालक चिरोटे!

साहित्य:
१) एक जुडी पालक
२) ६-७ हिरव्या मिरच्या
३)चवीसाठी आलं,ओवा, जिरे आणि  मीठ
४) मैदा..मावेल एवढा
५) तेल(तळण्यासाठी)
६) डालडा(वनस्पती तूप)
७) तांदळाची पिठी


कृती: पालकाची पाने स्वच्छ धुऊन घेऊन नंतर  पातळसर वाटून घ्यावी. जिरे,मिरच्या आलं ह्यांचा ठेचा बनवून त्यात चवीपुरते मीठ व ओवा घालावा. पालकाचे वाटण आणि ठेचा एकत्र करून त्यात मावेल इतका मैदा घालून पीठ घट्ट मळावे. तांदळाच्या पिठीत डालडा मिसळून एकजीव करून त्याचे सारण बनवावे.
साधारण दोन तासाने मळलेल्या पिठाची मोठी पोळी लाटावी; त्यावर सारण लावून पोळीची गुंडाळी करावी. गुंडाळीचे तुकडे करून ते लांबट चौकोनी लाटावे व तेलात तळावे. पापुद्रे सुटलेले,खुसखुशीत खारे चिरोटे दिवाळीच्या फराळाची लज्जत नक्कीच वाढवतील.


                         प्रेषक: श्रीमती जयबाला परूळेकर


३ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

मस्त! एक नवीन पदार्थ मिळाला प्रयोग करून पहायला. सुरेख दिसताहेत चिरोटे.

Meenal Gadre. म्हणाले...

कधी न ऐकलेला, खालेल्ला पदार्थ!!

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्त... तोंडाला पाणी सुटले !!!