मागणे!

अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो    ॥

पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो        १

फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो        २

 कवी: नचिकेत जोशी

७ टिप्पण्या:

  1. आत्मविश्व्वास जागविणारी तगडी कविता

    उत्तर द्याहटवा
  2. व्व्व्वा! आभाळच कवेत घेतलेत की. आवडले.

    उत्तर द्याहटवा