अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो ॥
पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो १
फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो २
कवी: नचिकेत जोशी
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो ॥
पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो १
फकीर जाहलो तरी सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो २
कवी: नचिकेत जोशी
सहीये रे!!
उत्तर द्याहटवाअप्रतिम! खूप खूप आवडली.
उत्तर द्याहटवाआत्मविश्व्वास जागविणारी तगडी कविता
उत्तर द्याहटवाamen :)
उत्तर द्याहटवाव्व्व्वा! आभाळच कवेत घेतलेत की. आवडले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर्वांना! :)
उत्तर द्याहटवासुपर्ब..! प्रचंड आवडली.
उत्तर द्याहटवा