
अरे खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
तिचा खोप्यामंदी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा, म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहिणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरंच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या. आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या पंक्ती जीवाला घोर लावून जातात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहिणाबाईंना सुचली त्या दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. त्या घरटी विणतात, त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो की हत्ती, घोडे, बैलांसारख्या मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही, पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करून किती सुंदर विणीचा खोपा तयार करतात.
![]() |
झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते. |
![]() |
किती बारीक लक्ष आहे पहा, खोपा व्यवस्थित झाला की नाही ते पडताळून पाहत आहे. |
![]() |
ही सुगरण बिचारी विणून विणून थकलेली दिसते. एकदाच जोर मारला असेल तिने खोपा लवकर तयार होण्यासाठी. |
![]() |
खोप्यांच्या इंटेरियर व डिझाइन्स मध्ये थोडा फार फरक जाणवतो |
ह्या सुगरणी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. एखादे लांबचे, म्हणजे रहदारी जिथे कमी असेल किंवा आपले(माणसाचे) गाव दिसणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड बहुतेक निवडतात, असा माझा अंदाज आहे. एकाच झाडावर ह्यांची १५-२० जणांची वस्ती विसावते.
ह्या सुगरणी, तसेच बरेच घरटी करणारे पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात आणि बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी ह्या सुगरणी किती मेहनतीने ही घरटी बनवतात. ईश्वरचरणी माझी एकच प्रार्थना आहे की आजच्या ह्या सिमेंटच्या जंगलात ह्यांच्या वस्तीला कुणाची नजर न लागो. उलट अधिकाधिक हिरवी ठिकाणे त्यांना त्यांच्या वस्त्यांसाठी उपलब्ध होवोत.
![]() |
फारच सुरेख फोटो आहेत प्राजक्ता आणि त्यासोबत लिखाणही अगदी सही! घर ही संकल्पना फक्त माणसासाठी जिव्हाळ्याची नसते, तर सगळेच प्राणीमात्र त्यात जीव गुंतवतात, हेच खरं.
उत्तर द्याहटवावा ! प्रत्येक फोटो अफलातून आहे अन त्यावरची माहितीपण खुप छान ! मस्त प्राजक्ता :)
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख आणी छायाचित्रे जागु !
उत्तर द्याहटवातुझ्या बारिक निरिक्षणाला मानाचा मुजरा :)
Classic photos!
उत्तर द्याहटवाI liked all.
सुरेख... निव्वळ अप्रतिम :) :)
उत्तर द्याहटवासुरेख. प्रत्यक्षात असतात तश्शीच अप्रतिम दिसताहेत. परंतु घरटी विणतांना ती प्रकाशचित्रात टिपणे तेवढे सोपे नाही. एकात तर पक्षी देखील आहे. कौशल्य आणि परिश्रम याचा अपूर्व संगम झालेला आहे.
उत्तर द्याहटवानुकतेच कुठेसे वाचले होते. बहुधा लोकसत्तेत उमेश वाघेला वास्तुरंग मध्ये लिहितात त्यांचेच असावे. नर घरटी बांधतात. त्याने बांधलेले घरटे पाहून मग मादी नराला पसंत करते. मग त्यांना पिले होतात.