ग्रहण!

नाच्या कपारीत आकाश होते
उरी कोंडलेले मम श्वास होते

कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला निघाले नि:श्वास होते?

जयांनी बहरले आयुष्य माझे
ते निव्वळ सुखाचे आभास होते

ग्रहण लागले जे जीवनास माझ्या
तेही सखे गं खग्रास होते!

कवयित्री: नेहा तांबोळी.

५ टिप्पण्या: