तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली
तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली
तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी
कवी: मंदार जोशी
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली
तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली
तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी
कवी: मंदार जोशी
छान आहे कविता - नितीन जोगळेकर
उत्तर द्याहटवाचोरटं प्रेम मस्त व्यक्त केलयसं..!! हीच तुझ्या कवितेची पोच'पावती' आहे.
उत्तर द्याहटवाछान आहे कविता.
उत्तर द्याहटवाअशा छोट्या छोट्या गोष्टी जपणं हेदेखील प्रेम असतं.
उत्तर द्याहटवाखरंय, पहिलं प्रेम हे न विसरता येण्यासारखं असतं आणि म्हणूनच अतिशय छोट्या गोष्टी आपन जपून ठेवतो. छानच!!
उत्तर द्याहटवावाह वाह... !!
उत्तर द्याहटवावा!
उत्तर द्याहटवाशेवटी प्रेम विसरला नाहीस तर!
jamalee naahee ajibaat
उत्तर द्याहटवा